Success Story: दूध विकणारा झाला बँकेचा मालक! याच्या जिद्दीची जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Success Story: दूध विकणारा झाला बँकेचा मालक! याच्या जिद्दीची जाणून घ्या संपूर्ण कहाणी

मुंबई : आजपर्यंत आपण आयुष्यत अशा लोकांना पाहिलं असेल की, त्याची परिस्थिती कशीही असो ते, त्यातून वाट काढत जिद्दीने पुढे जातात. मग त्यासाठी त्यांनी कितीही कठीण मार्गावरुन प्रवास करावा लागला तरी ते मागे पुढे पाहत नाहीत.

खरं सांगायतं झालं तर नेहमी मेहनती लोकं आयुष्यात पुढे जातात.  आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगत आहोत ज्यांनी हे करुन दाखवलं आहे. तुम्हाला जर सांगितलं की, एक दुध विकणारा व्यक्ती का बँकेचा मालक होतो आणि शेकडो लोकांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करुन देतो, तर कदाचित यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. परंतु हे खरं करुन दाखवलंय एका व्यक्तीने.

आज आम्ही तुम्हाला बंधन बँकेचे मालक चंद्रशेखर घोष यांच्या मेहनत आणि जिद्दीची कहाणी सांगणार आहोत, जे एकेकाळी घरखर्चासाठी दूध विकत होते.

चंद्रशेखर यांच्याकडे अभ्यासासाठी पैसे नव्हते, मग त्यांनी मुलांची शिकवणी घेऊन अभ्यास पूर्ण केला. यानंतर, महिलांना मदत करण्याची भावना त्याच्यामध्ये आली आणि त्यांनी बंधन बँकेची पायाभरणी केली. आज एका साध्या विचाराचे मूल्य 30 हजार कोटींपेक्षा जास्त झाले आहे.

चंद्रशेखर घोष एकेकाळी दूध विकायचे:
चंद्रशेखर घोष हे एका साध्या मिठाई विक्रेत्याचा मुलगा होते. त्रिपुराच्या अगरतला येथे जन्मलेले चंद्रशेखर लहानपणी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दूध विकायचे. ते आश्रमात जेवायचे आणि मुलांना शिकवणी शिकवून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांचे वडील एक लहान मिठाईचे दुकान चालवायचे आणि त्यांनी खूप अभ्यास करावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण साध्या मिठाईच्या दुकानातून घर चालवण्याबरोबरच मुलाला चांगले आणि उच्च शिक्षण देणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत चंद्रशेखर घोष यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मुलांची  शिकवणी घेऊन ढाका विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

एका विचाराने आयुष्य बदलले:
चंद्रशेखर घोष यांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी दरमहा फक्त 5 हजार रुपयांच्या पगारावर काम केले. पण घोष यांनी स्वतःचे भवितव्य ठरवले होते. घोष साधे जीवन जगण्यासाठी बनले गेले नव्हते. 1990  च्या दशकाच्या उत्तरार्धात, बांगलादेशमध्ये महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्हिलेज वेलफेअर सोसायटी नावाच्या स्वयंसेवी संस्थेने त्यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून नियुक्त केले.

तेथे त्यांनी पाहिले की गावातील महिला छोट्या आर्थिक सहाय्यानेही काम सुरू करून त्यांचे जीवनमान सुधारत आहेत. इथेच त्याच्यातील अब्जाधीश प्रथमच जागृत झाला. त्यांनी विचार केला की, अशा महिलांना आर्थिक मदत का देऊ नये. यामुळे अनेक लघु उद्योग सुरू होतील आणि महिलांसह देशही प्रगती करेल.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News