Viral Video: प्रदीपच्या मदतीला धावले एक्स आर्मी ऑफिसर; थेट रेजिमेंटशी केली चर्चा

Viral Video: प्रदीपच्या मदतीला धावले एक्स आर्मी ऑफिसर; थेट रेजिमेंटशी केली चर्चा

सध्या प्रदीप मेहरा या युवकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे.

रात्री १२ वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो.

व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचा संवाद अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी हा व्हिडीओ शूट करून तो शेअर केला आहे.

प्रदीपच्या जिद्दीचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतक लेफ्ट.जन.(नि) सतीश दुआ प्रदीपच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

चित्रपट निर्माते विनोद कापरी रात्री नोएडामधून आपल्या कारमधून जात असताना त्यांना खाद्यावर बॅग घेऊन धावत जाणारा एक मुलगा दिसला. त्यांनी त्या मुलाला (प्रदीप) त्यांच्या कारमधून घरी सोडण्याची अनेक वेळा ऑफर दिली, परंतु त्याने नकार दिला. त्यांनी विनोद कापरी यांना जे सांगितले ते ऐकून तुम्हीही विचार कराल की आयुष्यात प्रत्येकाला समस्या येतात, पण हार मानण्याऐवजी त्यांच्याशी लढले पाहिजे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.

सतीष दुआ यांचा मदतीचा हात:
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ यांनीदेखील प्रदीपसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ट्वीट करत त्याची प्रशंसा केली आणि त्याच्या योग्यतेच्या आधारावर भरती परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मदत करण्यास कुमाऊं रेजिमेंटचे कर्नल, माजी लष्कर कमांडर जनरल राणा कलिता यांच्यासोबत चर्चा केली आहे. आपल्या रेजिमेंटमध्ये भरती करण्यासाठी त्याला प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न करु असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी दिल्याचं सांगितलं

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News