Breaking: शेअर बाजार गडगडला, Sensex 843 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो -कोटी पाण्यात

NCAD

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला असून बाजारात (Share Market Updates) मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. आज मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्समध्ये (Sensex) 843 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टीमध्ये (Nifty) 257 अंकांची घसरण झाली.

सेन्सेक्समध्ये आज 1.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 57.147 अंकांवर खाली आला. तर निफ्टीमध्ये 1.49 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,983 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही आज 380 अंकांची घसरण झाली असून तो 38,712 अंकांवर पोहोचला.

आज शेअर बाजार ((Share Market Updates))  बंद होताना एकूण 1036 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2291 कंपन्यांचे शेअर्स घसरले. आज 133 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज Divis Labs, IndusInd Bank, Nestle India, JSW Steel आणि Eicher Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.  तर Axis Bank, Adani Enterprises आणि Asian Paints या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली.

आज बाजारात ऑटो, मेटल, आयटी, ऑईल अॅंड गॅस आणि रिअॅलिटी सहिस सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही एका टक्क्याहून अधिकची घसरण झाल्याचं दिसून आलं.

आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली:

  • Axis Bank- 1.12 टक्के
  • Adani Enterprises- 0.85 टक्के
  • Asian Paints- 0.63 टक्के

आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली

  • Divis Labs- 5.00 टक्के
  • IndusInd Bank- 3.78 टक्के
  • Eicher Motors- 3.50 टक्के
  • Nestle- 3.50 टक्के
  • JSW Steel- 3.49 टक्के

बाजाराची अस्थिर सुरुवात:
आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 13.14 अंकांनी वधारत 58,004 अंकांवर वधारला. तर, निफ्टी (Nifty) 15 अंकांनी वधारत 17,256 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.32 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता. 

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.