Bajaj आणि Honda ते TVS पर्यंत 2023 मध्ये मोठा धमाका, या आहेत जबरदस्त 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. 100 रुपयांच्या पुढे किंमती गेल्या आहेत. त्यामुळे वाहने घेताना तुम्हाला विचार करावा लागतो. आता तुम्ही कमी खर्चात वाहन अर्थात दुचाकी वापरु शकता. इंधन दर चढेच राहिल्याने इलेक्ट्रिक स्कूटरला मागणी वाढली आहे.

या मागणीमुळे, 2023 मध्येही अनेक उत्तम मॉडेल्स पाहायला मिळतील. तुम्ही नवीन वर्षात दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर या गाड्यांना प्राधान्य देऊ शकता. या दुचाकींची किंमत 70 हजार रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांच्या घरात आहेत. साधारण या बाईकचे मायलेज सारखेच दिसून येत आहे. या दुचाकीबाबत अधिक जाणून घ्या.

नवीन स्कूटर्स लाँच करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यापासूनच सुरु होईल. 2023 मध्ये सुझुकी ते Hero Electric, Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणणार आहेत. येथे आम्ही तुम्हाला 2023 मध्ये येणाऱ्या जबरदस्त 5 इलेक्ट्रिक स्कूटरची यादी देणार आहोत. त्याचबरोबर त्यांची किंमत रेंज आणि मायलेजही देत आहोत.

1) सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक (Suzuki Burgman Electric)
अपेक्षित लॉन्च तारीख – जानेवारी 2023
अपेक्षित किंमत –  1.20 लाख रुपये
इंजिन – 110cc
राइडिंग मोड – 2
मोटर पॉवर – 4kW
पूर्ण चार्ज श्रेणी – 60-80 किमी

2) हिरो  इलेक्ट्रिक ( Hero Electric AE-8)
अपेक्षित लॉन्च तारीख – जानेवारी 2023
अपेक्षित किंमत –  70,000 रुपये
टॉप स्पीड – 25 kmph
फुल चार्ज रेंज – 80 km
वैशिष्ट्ये – फुल-एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल

3) बजाज चेतक इलेक्ट्रिक (Bajaj Chetak Electric)
अपेक्षित लॉन्च तारीख – फेब्रुवारी 2023
अपेक्षित किंमत –  1,47,691 रुपये
राइडिंग मोड – 2
मोटर पॉवर – 4080w
पूर्ण चार्ज श्रेणी – 95 किमी

4) होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक (Honda Activa Electric)
अपेक्षित लॉन्च तारीख – सप्टेंबर 2023
अपेक्षित किंमत  – 1.10 लाख रुपये
मोटर पॉवर – 1kW
फुल चार्ज रेंज – 95 किमी.

5) टीव्हीएस क्रेऑन ( TVS Creon)
अपेक्षित लॉन्च तारीख – डिसेंबर 2022
अपेक्षित किंमत –  1.20 लाख रुपये
राइडिंग मोड – 2
मोटर पॉवर – 1200w
पूर्ण चार्ज श्रेणी – 80 किमी

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News