सायरन वाजवत धावणाऱ्या रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हे तर…

नाशिक (प्रतिनिधी) : इकडे रुग्णांचे नातेवाईक रेमडेसीव्हीर आणि ऑक्सिजनसाठी चिंतेत असतांना एका शहरात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक होतांना दिसून आलंय.. कोरोना काळात राज्याची परिस्थित बिकट होत असताना अद्यापही काही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसतेय. संगमनेर शहरात रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासन जीव तोडून काम करीत आहेत. प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी यंत्रणा काम करतेय. रुग्णावाहिका या कोरोना संकटात यंत्रणेचा महत्वाचा भाग आहे. परंतु रुग्णवाहिकेचाच वापर गैरकामासाठी केला जात असल्याची घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे.

संगमनेर शहरात नाकाबंदी दरम्यान, रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. मात्र त्यामध्ये पेशंट नसतानाही सायरन का वाजवतो. असी विचारणा पोलीसांनी केली. त्याचे उत्तरं देताना चालकाची भांबेरी उडाली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली तर त्यात देशी दारू आढळून आली.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News