creditcard

नाशिक-मुंबई महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 10 जखमी

axis

नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव लक्झरी बस आणि आयशर कारची जोरदार धडक झाली.

No posts found.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव लक्झरी बस आणि आयशर कारची जोरदार धडक झाली. रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी दाखल झाली आहेत. भरधाव कारनं समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. पोलिसांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात गोंदे गावाजवळ झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून कार हटवली असून पुढील तपास करत आहेत. या अपघातामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं असून सध्या 10 जण जखमी आहे. या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.