Weather Alert: राज्यात पुढचे दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात पुढचे दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; जाणून घ्या कारण

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात पुढच्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली.

होसाळीकर यांनी सांगितलं की, “बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे.”

हवामान विभागाच्या माहितीनुसार, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, बीड, रायगड, पुणे, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. परंतू धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी पाऊस माघारी गेल्यानंतर राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाल्याचं चित्र आहे. आज (शनिवार) पहाटे हवेच किंचित गारवा होता तर मुंबई अजूनही दमट व गरम वातावरण आहे. शनिवारी सकाळचं तापमान सातारा 18.7°C, नाशिक 16.3, सोलापूर 18.6, औरंगाबाद 18.4, महाबळेश्वर 15.8, पुणे 18.4, बारामती 18.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News