एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव

मुंबई ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महामंडळाने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तब्बल 28 हजार कर्मचाऱ्याची नोकरी जाण्याची शक्यता आहे. बीएसएनएल नंतरची ही सर्वात मोठी स्वेच्छा निवृती असणार आहे.

एसटी महामंडळाकडून 50 वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती दिली जाईल. महामंडळात काम करणाऱ्या 28 हजार कर्मचाऱ्यांचं वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे. या निर्णयमुळे महामंडळाची दरमहा 100 कोटी रुपयांच्या पगाराची बचत होणार आहे. स्वेच्छा निवृत्तीसाठी चौदाशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबत महामंडळ राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. राज्य सरकारने निधी दिला तरंच हा निर्णय होऊ शकणार आहे.

क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाल्यानं योजना आणण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे. राज्यात एक बस मागे 6:15 कर्मचारी आहेत. देशाच्या 14 राज्याच्या परिवहन मंडळात हे प्रमाण एक बस मागे पाच कर्मचारी आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News