BREAKING NEWS: केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

मुंबई (प्रतिनिधी): मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.

त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांकडे नारायण राणे यांचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News