नौदलाचे मिग २९ विमान क्रॅश, वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले

भारतीय नौदलाचे मिग २९ के हे विमान हे नियमित सरावादरम्यान गोव्यानजीक आज सकाळी कोसळले. पण वैमानिकाला सुरक्षितपणे बाहेर पडता आल्याने कोणतीही जिवित हानी या घटनेतून घडली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नौदलाकडून देण्यात आल्याचे कळते.

mig 29 crashed

या विमानाने आयएनएस हस्ना या नौदलाचा तळाच्या वास्को येथून टेक ऑफ घेतला होता. गेल्याच वर्षी अशाच स्वरूपाची एक घटना घडली. गेल्यावर्षीही गोव्यात डाबोलिम येथे गोवा येथेही अशाच स्वरूपाची घटना घडली होती. घटनेत कॅप्टन एम शेओखंड आणि लियुटनंट कमांडर दीपक यादव हे सुरक्षितपणे बाहेर पडले. घटनेदरम्यान विमान हे एका पक्षाला धडकल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याने इंजिनमध्ये बिघाड होऊन हे विमान कोसळल्याची माहिती आहे. पण दोन्ही वैमानिकांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे हे विमान जास्त लोकसंख्या असलेल्या जागेपासून खुल्या जागेत नेऊन क्रॅश करण्याची मोठी कमालच झाली.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News