Empowering Media ! 29 April 2009, Last Updated At:
19.00Hrs.
रणशिंग
फुंकले
अमेरिकेकडून मिळणार्या मदतीचा वापर
भारताविरूद्ध
न्यूयॉर्क - दहशतवादाविरूद्ध
लढण्यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात
येणारी अ र्थिक मदत तिप्पट करण्याच्या
प्रस्तावाला सिनेटकडून हिरवा कंदील
दाखविल्याबद्दल भारताने अमेरिकेकडे पुन्हा एकदा
नाराजी व्यक्त केली आहे. इस्लामाबादकडून या
मदतीचा वापर भारताविरूद्ध केला जात असल्याचे
भारताने आज (शुक्रवारी) सुरक्षा परिषदेत
स्पष्ट केले.
सुरक्षा परिषदेच्या उद्घाटन
सत्रात बोलताना परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा
म्हणाले कि, दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी
अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी अर्थिक मदत
भारता विरूद्ध सुरक्षा यंत्रणा मजबूत
करण्यासाठी वापरली जाते. याची कबुली खुद्द
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ
यांनी दिली आहे.