Breaking: संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई; अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी मोठी बातमी समोर आली आहे.

सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे.

ईडीने जप्त केलेली संपत्ती मुख्यत: अलिबाग आणि मुंबईतील आहे.

ईडीने संजय राऊत यांची जी संपत्ती जप्त केली त्यामध्ये दादर याठिकाणी असणारा एक फ्लॅट तर अलिबागमध्ये असणाऱ्या 8 जागा आहेत. प्रविण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती एजन्सीने दिली आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

या कारवाईनंतर संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझं कुटुंब राहतं. ईडीच्या कारवाईला सामोरं जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत.’ शिवाय आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रतिआव्हानचं दिलं आहे. सध्या त्याचं ट्वीट देखील चांगलचं चर्चेत आलं आहे.

काय आहे प्रकरण?:
गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वी देखील सध्या ज्याप्रकारे ईडी महाराष्ट्रातील नेत्यांवर कारवाई करत आहेत त्यावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधाला होता. तेव्हा त्यांनी भाजपच्या काही नेत्यांची नावं घेत त्यांना देखील जाब विचारला होता.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News