महाराष्ट्रातील शाळा-कॉलेज बंद करण्यासंदर्भात योग्य पद्धतीने निर्णय घेण्यात यावा – फडणवीस

मुंबई : कोरोना व्हायरस भारतामध्ये दाखल झाला होताच परंतु तो कालपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये आढळला नव्हता, परंतु पुण्यामध्ये याचे दोन रुग्ण असल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पुण्या मध्ये कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. परदेशात राहणाऱ्या मुलांचे पालक मायदेशी येत असतात, त्यांची नीट तपासणी झाली आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाळा-कॉलेज बंद करण्यासंदर्भात योग्य पद्धतीने निर्णय घेण्यात यावा. सरसकट निर्णय घेण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या गोष्टी कराव्यात. भीतीचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, असं फडणवीस म्हणाले. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.

कोरोनाचे हे दोन रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना आवाहन केलं आहे, ते म्हणाले की, या दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नये.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News