कोरोनासाठी रक्ताची चाचणी केली जात नाही तर..

सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( ‘नसो फैरिंजीयल स्वाब’ ) घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढवण्यात येणार आहे. अशी महत्त्वाची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत आरोग्य विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News