BREAKING: देशाला कोरोना लस देणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग

पुणे: देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

इमारतीत 4 जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही,अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान याठिकाणच्या संशोधकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News