रात्रपाळीचे डॉक्टर कुठे होते? 10 नवजात बाळांचा बळी घेणाऱ्या रुग्णालयाबद्दल संशयास्पद सवाल

नवजात बाळाला नवजात केअर युनिटमध्ये दाखल केल्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका कायम हजर असतात.

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात आग लागल्यामुळे गुदमरून 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुले महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये ही घटना घडलीच कशी असे सवाल उपस्थितीत केले जात आहे.

दिव्य मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री 2 वाजेच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या परिचारिकेनं सिंक न्युबॉर्न केअर युनिटने दार उघडले असता आतामध्ये मोठ्या प्रमाणात धूर साचलेला होता. रात्रीपाळीच्या वेळी एकही कर्मचारी तिथे हजर नव्हता.  एवढंच नाहीतर काही मुलांच्या काचा काळ्या पडल्या होत्या. त्यामुळे आग ही खूप आधी लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पण, याबद्दल स्टाफला काहीच पत्ता नव्हता.

नवजात बाळाला नवजात केअर युनिटमध्ये दाखल केल्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका कायम हजर असतात. सिक न्युबॉर्न केअर युनिटमध्ये रात्रपाळीला 1 डॉक्टर आणि  4 ते 5 परिचारिका ड्युटीवर असतात. पण घटना घडली तेव्हा एकाच परिचारिका हजर होती. इतर परिचारिका आणि डॉक्टर कुठे होते? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

रुग्णालयामध्ये आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. पण तिथे असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निगराणी ठेवण्यासाठी नियम घालून दिले आहे. असे असतानाही आग नेमकी लागलीच कशी? असा सवालही विचारला जात आहे.

त्याचबरोबर आगीची घटना टाळण्यासाठी स्मोक डिटेक्टर लावलेले असतात. पण नवजात केअर युनिटमध्ये स्मोक डिटेक्टर लावण्यात आले नव्हते, अशी बाबसमोर आली आहे.

सर्व रुग्णालयांचे होणार ऑडिट!

दरम्यान, भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News